आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा
त्रिपुरा आणि नागालँड मध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे त्यामुळे शहरातील चन्नम्मा सर्कल येथे आज भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी चन्नम्मा सर्कल येथून भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाची रॅली काढली. यावेळी बोलताना ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बेळगाव मध्ये चन्नम्मा सर्कलमध्ये उभा राहून अगदी छातीठोकपणे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार आलेलं आहे त्याचा विजय साजरा करतोय असे सांगितले.
त्यानंतर ते म्हणाले की संपूर्ण देशाने आज नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता होणे सध्या अवघड आहे. जगातले नेते मंडळी आणि जगातली जनता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करत आहे.
एक सच्चा देशभक्त एक सच्चा भारतीय जो भारताची हिंदू संस्कृती जपण्या सोबतच भारतीय परंपरा मनामध्ये आपला एक विचार घेऊन काम करत असलेले पंतप्रधान या देशाला मिळणं हे आम्हा सगळ्यांचे सौभाग्य आहे.
तसेच आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकते एकत्रित येऊन येणारे निवडणुकीमध्ये काम करणार आहेत.2023 मे महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार कर्नाटकामध्ये परत एकदा येणार आहे. त्याबरोबरच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्याची जिद्द आणि इच्छा मनामध्ये बाळगणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिवस रात्र काम करत आहेत.आणि जनतेचाही विश्वास आहे की पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत येणार असल्याचे असे त्यांनी बोलताना सांगितले.