पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या 92 धावा
दुसरी कसोटी
पुणे:
येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 24 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरी कसोटी खेळली जात आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये न्यूझीलंडने फलंदाजी करताना दोन बाद 92 धावा केल्या होत्या. या दोन्ही विकेट भारतातर्फे गोलंदाज अश्विन यांनी घेतल्या होत्या.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड तर्फे टॉम ने 22 धावांचे तर विल यंग याने 18 धावांचे योगदान दिले. या दोघांनाही आर अश्विनीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा सकाळी 11:30 वाजेपर्यंत न्यूझीलंडने 31 ओवर मध्ये दोन बाद 92 धावा केल्या होत्या. सचिन रवींद्र पाच धावांवर तर कॉन्वे 47 धावावर नाबाद खेळत. भारताने पुणे येथील दुसऱ्या कसोटीसाठी सुंदर वॉशिंग्टन आणि शुभमन गिल यांचा समावेश केला आहे. पहिल्या सत्रांमध्ये दोन्ही संघांचे समान वर्चस्व असल्याचे दिसून आले. भारताला आता झटपट विकेट मिळवण्याची गरज आहे. पुणे येथील खेळपट्टी मध्यमगती गोलंदाजांपेक्षा स्पिनर गोलंदाजांना साथ देत असल्याचे दिसत आहे.