हिडकल जलाशयात मंगळवारी ३८ टीएमस पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले नाही.
मात्र अधिवेशन झाल्यानंतर त्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. संकेश्वर हुक्केरी, बेळगाव या शहरांना नियमित ८ क्युसेक पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या संकेश्वर, हुक्केरी बेळगावसाठी केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हुक्केरी तालुक्यात पाण्याची टंचाई नसून उपलब्ध पाण्याचा सुरक्षित पुरवठा केला जात आहे. हिरण्यकेशी, घटप्रभा, मार्कंडेय, ताम्रपर्णी या नद्यांची पात्रे भरून प्रवाहित होत आहेत.
असे असले तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील विहिरी, ओढे, नाले कोरडे आहेत. हिरण्यकेशी नदीतून पाणी उपसा करण्यात आल्याने परिसरातील ३३ तलाव भरण्यात यश आले आहे. पाणीटंचाई उद्भवल्यास उपाययोजना हाती घेण्याची सूचना तालुका प्रशासनाला केली आहे.