युवा हा देशाचा कणखर बांधा असतो-प्राचार्य बी.जी. कोलुचे
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालया तर्फे उक्कुड गावी आयोजित एन.एस.एस.शिबिरा मध्ये “युवक देशाचा कर्णधार” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विशेष व्याख्याते म्हणून बी.के. महाविद्यालय बेळगाव चे बी.बी.ए.चे प्राचार्य बसवराज जी. कोलुचे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान ग्रंथपाल प्रा. सुरेखा कामुले यांनी भूषवले होते.
प्रारंभी ईशस्तवन आणि स्वागत झाल्या नंतर विशेष व्यक्ता या नात्याने बोलताना प्राचार्य बी.जी. कोलुचे म्हणाले ,एन.एस.एस. युवांच्या मध्ये व्यक्तित्व विकासा बरोबर देश प्रगतीची चेतना भरण्याचे कार्य करते. युवा हाच देशाचा मजबूत बांधा असतो. तो आपल्या कार्यक्षमते नुसार देशाला मजबुती प्रदान करत असतो .युवांच्या सुंदर विचार,संस्कार आणि कार्यक्षमतेवर देशाची प्रगती साध्य आहे.
अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्रा. सुरेखा कामुले म्हणाले की, देश युवकांच्या मुळेच बलिष्ठ म्हणून गणला जातो. ज्या देशांमध्ये उत्तम युवा वैज्ञानिक, उत्तम राजकारणी आणि उत्तम नागरिक असतात तेच देश उंच शिखर गाठू शकतात. या कार्यक्रमाला डाँ. वृषाली कदम ,प्रा. अर्चना भोसले आणि एन.एस.एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते .कार्यक्रमाच्या शेवटी एन.एस.एस. अधिकारी प्रा राजू हट्टी यांनी सर्वांचे आभार मानले.