धरणात बुडून युवकाचा मृत्यू
सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी येथे धरणात बुडून एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे ही घटना रंगोत्सवादिवशी घडली असल्याने रंगाचा बेरंग झाला आहे अविनाश देवलेकर असे या युवकाचे नाव आहे.
अविनाश हा रंगपंचमी खेळून आपल्या मित्रांसमवेत धरणाच्या पाण्यात आंघोळी करिता गेला होता यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तो आपल्या मित्रांसमवेत फादरवाडी गावाबाहेरील तलावात आंघोळी करिता गेला होता यावेळी ही दुर्घटना घडली आहे