*तरुण आणि तरुणींनी राष्ट्र कार्यात स्वताला झोकून द्यावे प. पू दादा महाराज*
रविवार दिनांक 4 जुन रोजी सायंकाळी जत्राट येथे मराठी मुलांची शाळेच्या मैदानावर भक्ती शक्ती संगम कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी साधु, संत, महंत यांचे गावातून रांगोळी काढून पाणी घालून वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री अमरनाथ देवालय १०८ शिवलिंग मंदिर भालवणी जिल्हा सांगली येथील परमपूज्य दादा महाराज हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित.
दत्तपीठ श्रीक्षेत्र तमनाकवाडा येथील सद्गुरु सचिदानंद बाबा.
श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीज.
विजापूर येथील परमपूज्य प्रभुलिंग स्वामीजी.
परमपूज्य मौनी महाराज परमपूज्य अमरजी महाराज वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण श्रीधर महाराज हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम जत्राट गावच्या वतीने सर्व साधू संतांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात प . पू दादा महाराज यांनी शंख नाद करुन आणि झाडाला पाणी अर्पण करून करण्यात आली. यावेळी परमपूज्य सद्गुरु सच्चिदानंद महाराज म्हणाले की सध्याची पिढी ही संस्कृती,धर्म, अध्यात्म याच्या पासून लांब जात आहे याचा विपरीत परिणाम म्हणून आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे टीव्ही मोबाईल व्हाट्सअप फेसबुक हे माणसाच्या सोयीसाठी निर्माण झाले आहेत पण आज माणूस इतका या गोष्टींच्या आहारी गेला आहे की या गोष्टीशिवाय त्याचं जगणं मुश्किल झालेला आहे या या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर यायचं असेल तर साधुसंत महात्मे यांच्या सानिध्यात देव, देश आणि धर्माचे कार्यात स्वतःला झोकून ददिलं पहिजे असे आव्हान परमपूज्य सद्गुरु सचिदानंद बाबा यांनी केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते परमपूज्य दादा महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीमधून राष्ट्र, धर्म, संस्कृती, याच्या रक्षणासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास, संत तुकाराम महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपल्या प्रजेचे रक्षण केले त्याचप्रमाणे निपाणी परिसरात परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी जे कार्य करत आहेत
त्यांच्या मार्गदर्शनाखाली जत्राट सह निपाणी मधील तरुण तरुणींनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपला देव,देश, धर्माचं कार्य कृतिशील करावे तसेच माता भगिनींनी आपला धर्म आपली संस्कृती याचे जतन व आचरण करावे आज लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे निपाणी परिसरातील कोणत्याही माता-भगिनींना असा कोणताही त्रास होत असेल किंवा कोणी देत असेल तर त्यांनी समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना संपर्क करावा यामधून त्या तरुणीची नक्कीच सुटका होईल तसेच आज भक्ती शक्ती संगम कार्यक्रम जत्राट येते ज्या उत्साहात झाला अशाच उत्साहात निपाणी व निपाणी परिसरातील प्रत्येक गावामध्ये अशा कार्यक्रमाचे नियोजन करावे कारण साधुसंत यांनी सर्वस्वाचा त्याग करून समाजासाठी आपले जीवन अर्पण केले आहे
समाजाच्या हितासाठी ते नेहमीच तत्पर असतात परमपूज्य प्राणलिंग स्वामीजींनी निपाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोमातेचे रक्षण केले आहे तसेच लव्ह जिहाद मधून हिंदू तरुणींची मुक्तता ही केलेली आहे तसेच कोरोना काळ असेल किंवा महापुराचा काळ असेल यामध्ये त्यांनी समाजाला सदैव मदतीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मदत पोहचवली आहे यासाठी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजींचे मार्गदर्शनाखाली सर्व तरुणांनी एकत्रित येऊन निपाणी निपाणी परिसरामध्ये हिंदूंचं एक मोठं संघटन होणे गरजेचे आहे असे मत परमपूज्य दादा महाराज यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी जत्राट मधील वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण परमपूज्य श्रीधर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निपाणी परिसरात हिंदूंच्या मदतीसाठी कायदेशीर मदत करणारे अधिवक्ता गणेश गोंधळी यांचा सत्कार सर्वसाधू संतांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू कलोळ यांनी केले तर सूत्रसंचालन सागर श्रीखंडे यांनी केले तर आभार विकास जबडे आणि गुंडुराव तवदारे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील हा सर्व तरुण मंडळी यांनी विशेष असे सहकार्य केले या कार्यक्रमासाठी जत्राट येथील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच भिवशी सोंदलगा अकोळ यमगर्णी कोडणी व निपाणी येथील तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.