क्षुल्लक कारणातून तरुणाची आत्महत्या
बेळगाव:
70000 रुपयाचा महागडा फोन कशाला खरेदी केलास अशी विचारणा वडिलांनी मुलाकडे केली होती. मात्र हा राग मनात धरून संबंधित तरुणाने क्षुल्लक कारणातून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव मुस्ताफीज अब्दुलरशीद शेख (वय 24, राहणार न्यू वैभव नगर ) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच मुस्ताफीज याने महागडा स्मार्टफोन खरेदी केला होता. त्यामुळे वडिलांनी त्याला एवढ्या महागड्या किमतीचा फोन विकत घेणे खरेच गरजेचे होते का? असे विचारले होते. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. हा राग धरून त्याने गुरुवारी आत्महत्या केली होती. या प्रकरणाची एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.