बालवीर विद्यानिकेतनमध्ये योगा तासांना सुरुवात
बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला 11 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे .आज दिनांक 15 एप्रिल पासून योग विद्याधाम संस्था मराठा मंदिर, बेळगाव यांच्या वतीने योगा तासांचे उद्घाटन बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री प्रेमानंद गुरव सर यांच्या शुभहस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. योग विद्याधाम संस्था मराठा मंदिर बेळगाव यांच्या वतीने सकाळी 7:00 ते 8:00 या वेळेत योगाचे तास घेतले जाणार आहेत .
यासाठी श्री अच्युत्य माऊली सर, श्री सचिन पाटील सर, श्री गिरीश तेंडुलकर सर, श्री सुनील चौगुले सर, श्री श्रीकांत प्रभू सर अशी पाच योग गुरूंची टीम योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होती .हे शिबिर पंधरा दिवस चालणार असून या शिबिरामध्ये योगा, पोहणे, धावणे यासह मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, कन्नड, समाज या विषयांचे सुद्धा मार्गदर्शन होणार आहे .या संपूर्ण शिबिराचे आयोजन अध्यक्ष मा. श्री प्रेमानंद गुरव सर आणि श्री डी डी बेळगावकर सर यांच्या सहकार्यातून होत आहे .
या उद्घाटन समारंभ प्रसंगी बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक शंकर चौगुले , दशरथ पाऊसकर, राजू मुजावर व शंभरहून अधिक शिबिर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, भाग्यश्री कदम, क्रीडा शिक्षक गोविंद गावडे, सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शहापूरकर यांनी केले.