सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि सरकारी पूर्व प्राथमिक कन्नड शाळा राजहंसगड येथे येळ्ळूर केंद्र पातळीवर प्रतिभा कारंजी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी शाळेमध्ये येळ्ळूर क्लस्टर लेबल प्रतिभाकारंजी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
सदर घेतलेल्या स्पर्धेमध्ये धार्मिक पठण मध्ये सुशांत घाडी याने प्रथम क्रमांक चित्रकला स्पर्धेत साईनाथ अनंत पाटील इयत्ता तिसरा प्रथम क्रमांक तात्काळ भाषण स्पर्धा रचना धामणेकर हिने प्रथम क्रमांक अभिनय गीत यामध्ये राधा कानशीडे ही ने प्रथम क्रमांक कुंटपाट मध्ये श्रद्धा काकतकर ही ने तिसरा क्रमांक तर लघु संगीत मध्ये साई धामणेकर यांनी द्वितीया आणि कथाकथन या स्पर्धेमध्ये गणराज धामणेकर इयत्ता चौथी याने द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे सर्व विजेते हे पहिली ते चौथी इयत्ता मध्ये शिकत आहेत.
तर पाचवी ते सातवी मध्ये झालेल्या धार्मिक पठण स्पर्धेमध्ये वैष्णवी कुंडेकर हिने प्रथम क्रमांक कथाकथन मध्ये पूर्वी घाडी इयत्ता पाचवी हिने प्रथम क्रमांक चित्रकला स्पर्धेत वैदेही पाटील हिने प्रथम क्रमांक तात्काळ भाषण स्पर्धेत जयदीप खेमानकर यांनी प्रथम क्रमांक नक्कल स्पर्धेत सोहम बुवा यांनी प्रथम क्रमांक कंठपाठ कन्नडमध्ये श्रीशा तृतीय क्रमांक तर अभिनय गीत आणि कविता वाचन या स्पर्धेमध्ये चांगुना पाटील आणि समीक्षा पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.