कुस्ती वस्ताद व प्रसिद्ध पैलवान काशिराम पाटील यांचे निधन
कंग्राळी खुर्द :- येथील प्रसिद्ध पैलवान कुस्ती वस्ताद काशिराम कल्लाप्पा पाटील वय 54 यांचे अल्पश अजाराने आज (दि 26 रोजी ) निधन झाले त्यांनी भारतीय सैन्य दलात 22 वर्षे देशसेवा व कुस्ती कोच म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी सैन्य दलातून तसेच खुल्या कुस्ती आखाड्यातून अनेक कुस्त्या जिंकून बेळगाव व कर्नाटकाचा लौकिक वाढवला होता.
.त्यांनी विना मोबदला वस्ताद म्हणून सेवा करत असतांना कंग्राळी व परिसरातून अनेक मल्ल घडवले आहेत .त्यांचे पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय बहीन असा मोठा परिवार आहे. जुन्या पिढीतील प्रसिद्ध पैलवान कल्लापा पाटील यांचे ते पुत्र होते तर मा.ग्रा पं. अध्यक्षा रुक्मिणी निलजकर यांचे भाऊ होते अंत्यविधी शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 9.30 वाजवा होणार आहे.