ज्योती सेंट्रल स्कूल येथे शिक्षकांसाठी “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” या विषयावर कार्यशाळा संपन्न
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल येथे 24 एप्रिल 2025 रोजी “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी चेअरमन आर.के.पाटील सर, व्हाइस चेअरमनआर.एस.पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर आणि न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेचे चेअरमन आर.वाय.पाटील सर तसेच राजगोळकर सर उपस्थित होते.https://dmedia24.com/start-at-child-education-and-vidya-vikas-camp/
डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस, कोल्हापूर यांनी सर्वांगीण विकासावर शिक्षणाच्या प्रभावावर भर देत आपले कौशल्य स्पष्ट केले. या कार्यशाळेत एकूण पन्नास शिक्षक हजर होते.
शालेय एस.एम.सी.कमिटीचे चेअरमन निवृत्त प्राचार्य आर.के.पाटील सरांच्या”एक पेन, एक पुस्तक आणि एक शिक्षक विद्यार्थ्याचे जीवन व संपूर्ण जग बदलू शकतात” या प्रेरणादायी संदेशाने कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका श्रीमती कृपा कदम यांनी केले.