This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बस मध्ये सीटवर बसण्यावरून महिलांची फ्री स्टाईल मारामारी*

*बस मध्ये सीटवर बसण्यावरून महिलांची फ्री स्टाईल मारामारी*
D Media 24

बस मध्ये सीटवर बसण्यावरून महिलांची फ्री स्टाईल मारामारी

बसमध्ये सीटवर बसण्यावरून महिलांनी चालत्या बसमध्ये फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना म्हैसूर येथे घडली आहे.
म्हैसूरहून चामुंडी बेट्ट येथे निघालेल्या बसमध्ये सीट वर बसण्या वरून दोन महिलात वाद सुरू झाला.काही वेळातच दोन्ही महिला एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या आणि बसमध्ये सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी.एकमेकींना शिवीगाळ करत या दोन महिला एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या.

धावत्या बसमध्ये ही हाणामारी सुरू झाल्याने बसमधून प्रवास करताना अन्य प्रवाशांना फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.या महिलांची हाणामारी सुरू झाल्यावर त्यांचे पतिदेव देखील हाणामारीत उतरले.बसमध्ये सुरू असलेला प्रचंड गोंधळ पाहून लहान मुले रडायला लागल्या मुळे गोंधळात आणखी भर पडली.कर्नाटकात काँग्रेस सरकारने शक्ती ही महीलासाठी मोफत बस प्रवास योजना अमलात आणली आहे.त्यामुळे महिला मोठ्या संख्येने धार्मिक स्थळी आणि पर्यटन स्थळी जात आहेत.काही ठिकाणी तर बसचा दरवाजा निखळल्याच्या घटना घडल्या आहेत.महिलांच्या वाढत्या गर्दीमुळे अन्य प्रवाशांना बसने प्रवास करणे त्रासदायक झाले आहे .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply