हॉकी हा रोमांचक भारतीय मैदानी खेळ असून या खेळात पूर्वापार पुरुष हॉकीपटूंचा दबदबा होता. अलीकडे महिलांनीही या खेळावर निर्विवादपणे वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे. मराठा मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांचे मराठा मंडळ संस्थेत शिक्षण घेत असणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यावर विशेष प्रेम असून, अभ्यासाबरोबर क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनीनी खडतर मेहनत घ्यावी असा त्यांचा मनोदय कायम राहीला आहे.
संस्थेतील खेळाडू विद्यार्थ्यांनी तालुका जिल्हा राज्य पातळीवर व देश पातळीवर वयक्तिक व सांघिक स्पर्धा गाजवून आपली चमक दाखवावी यासाठी योजनाबद्ध व प्रयत्नपूर्वक या संस्थेतील शाळांच्या क्रीडांगणाची कायापालट केली जात असून भारताच्या भविष्यातील खेळाडूंचे स्वप्नं साध्य करण्यासाठी त्या सदोदित प्रयत्नशील आहेत. याचीच प्रचिती म्हणजे अलीकडे बेळगाव जिल्हा विभागीय स्पर्धेमध्ये येथील ताराराणी हायस्कूलच्या खेळाडूंनी विद्यार्थ्यांनीनी क्रीडा स्पर्धेतील अनेक यशोमय शिखरं सर केल्याचे चित्र दिसत आहे. . ताराराणीच्या कोवळ्या खेळाडू रणरागिणीनी वैयक्तिक स्पर्धेत तर उज्ज्वल यश संपादन केले असून सांघिक खेळामध्ये सुद्धा आपला रुबाब कायम ठेवला आहे.
यापूर्वीच शाळेच्या खेळाडू विद्यार्थिनींनी थ्रो बॉल स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला असून, त्या राज्यस्तरीय स्पर्धेची आतुरतेने वाट पाहताहेत.
नुकताच चंदर्गी येथे संपन्न झालेल्या हॉकी विभागीय स्पर्धेत सुरूवायतीलाच चिकोडी जिल्हाचं नेतृत्व करणाऱ्या संघाला 4 /0 ने नमवत, दुसऱ्या फेरीत तुल्यबळ बागलकोट संघाला 5/ 0 ने हरविले तद्नंतर चुरशीच्या अंतिम सामन्यात “करो या मरो” या सुत्राचा अवलंब करीत धारवाडच्या डी वाए एस बलाढ्य संघांचा 1/0 ने पराभव करीत प्रेक्षकाच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
येथे निर्विवादपणे ‘स्व’कौशल्यांच्या जोरावर ताराराणीच्या खेळाडूंनी चाहत्यांची मनं तर जिंकलीच शिवाय खानापूर तालुक्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवला आणि महिला हाॅकीत एक अभूतपूर्व विजयाची ऐतिहासिक नोंद घडविली आहे..
या विजयी संघाचे नेतृत्व कॅप्टन मयुरी कंग्राळकर हीने केले, या संघाचे बलस्थान म्हणजे तगडा गोलकीपर नेत्रा गुरव ही असून कुमारी साक्षी पाटील, राधिका पाटील, साक्षी चौगुले, सविता चिगदीनकोप, आयेशा शेख, प्रीती नांदुडकर, ममता कुंभार, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, श्रेया गोंधळी, वैष्णवी ईटनाळ, सेजल भावी, तनुश्री गावडे, निशा दोडमनी, भूमी लटकन, वैष्णवी नाईक या संघ सदस्य आहेत.
या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू व संचालक श्री शिवाजीराव पाटील तसेच ज्येष्ठ संचालक परशराम गुरव शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन जाधव यांचे सदैव प्रोत्साहन मिळत आहे.
तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत असून, ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्यासह बेळगाव हॉकी फेडरेशन सेक्रेटरी श्री सुधाकर चाळके, कोच उत्तम शिंदे, शुभेच्छूक संतोष दरेकर, गणपत गावडे, सदस्य नामदेव सावंत, मनोहर पाटील, क्रीडा शिक्षक श्री वाय एफ निलजकर, श्री सी के
गोमानाचे, श्री यु एम धबाले श्रीमती एम एन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशासाठी सदर खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तसेच कोडगू जिल्ह्य़ातील मडीकेरी येथे संपन्न होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यांनी आवर्जून दुरधवणीद्वारे *विजयीभव* च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता या खेळाडूंची नजर राज्यस्तरीय स्पर्धेकडे आहे.