न्यायालयात न्यायमूर्तीच्या देवीची नवीन मूर्ती
नवी दिल्ली:आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तीची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचुड यांच्या आदेशानुसार अनेक बदल करण्यात आले आहेत.या नव्या मूर्तीमध्ये पूर्वीच्या न्यायमूर्तीच्या डोळ्यावर असलेली पट्टी काढण्यात आली आहे.
तसेच पूर्वीच्या तलवारीऐवजी हातामध्ये संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी हे मूर्तीमधील बदल सुचविले आहेत. भारतीय कायदा आंधळा नाही असे दाखवणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अशी मूर्ती बनवण्याचा आदेश दिला होता त्यानुसार ही मूर्ती बनवण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये दाखवण्यात आलेली अंध कायदा आणि शिक्षेची चिन्हे आजच्या काळाला अनुसरून नव्हती. त्यामुळे असे बदल मूर्तीमध्ये करण्यात आले असून या मूर्तीमध्ये एक गोष्ट अशी आहे , जी बदल करण्यात आलेली नाही ती म्हणजे तराजू म्हणजेच समान न्यायव्यवस्था.
या नवीन न्यायमूर्तीच्या हातामध्ये आजही मोजमाप ठेवले आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालय कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेते म्हणून तराजू हे संतुलनाचे प्रतीक मानले जाते. आता न्यायमूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढून खरोखर डोळसपणाने न्याय दिला जाईल का ? असा प्रश्न तमाम जनतेतून विचारण्यात येत आहे.