छत्रपती शिवाजीनगर येथील तिसऱ्या गल्लीत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून सांडपाणी व गटारी तुंबलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे डेंग्यू,मलेरिया,निमोनिया या सारख्या आजाराना पोषक वातावरण तयार झाले आहे वॉर्ड नं १३ च्या नगरसेविका रेश्मा बैरकनवर यांना या प्रभागात निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करुण देण्यात आली आहे.
तसेच या बाबात तक्रार देत स्वच्छता व नवीन कामाचा बाबतीत निवेदन देण्यात आले असून ही समस्या तातडीने निवारण करावी आशी विनंती निवेदेनाच्या माध्यमातून संबंधीत नागरिकांनी केली आहे.वेळी महांतेश आलगोंडी ,नागेश सूर्यवंशी, अभि आलगोंडी,अजित लठ्ठ,रणजित मोटेकर,स्वप्नील सांबरेकर,विशाल खन्नूकर,सुमित कामुचे,संगमेश,प्रकाश वेर्णेकर आदी उपस्थित होते.