*संशयाची ठिणगी पेटणार का विजणार ?*
भाजप पक्षांनी ज्या उमेदवारांचे तिकीट नाकारले हे सर्व उमेदवार नाराज आहेत त्यामुळे याचा फायदा आता काँग्रेस उठवणार का अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. भाजपचे लक्ष्मण सौदी यांचे तिकीट नाकारल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती त्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. तर आता काँग्रेस पक्षाचे बेळगावचे माजी आमदार फिरोज सेठ यांनी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या खांद्यावर हात हा ठेवल्याने अनेक जण तर्कवितर्क लढवत आहेत.
बीजेपी ने नाराज केल्याने आता बेनके काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का याचीही चिन्हे आहेत का असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्यातच फिरोज सेठ यांचे बंधू राजू सेठ यांनी देखील बेनके यांच्या खांद्यावर हात टाकून अनेकांना गोंधळात टाकले आहे.
जर काँग्रेस पक्षाने बेनके यांना तिकीट दिल्यास सेठ बंधूंचा बेळगाव मधील पत्ता कट होऊ शकतो. भाजप सरकारने आणि बेनके यांची वाट लावली आहे मग आता बेनके हे सेठ बंधूंची वाट लावणार का असा प्रश्न उद्भवला आहे.
सध्या कारण काहीही असो सेठ बंधूनी आमदार बेनकेच्या खांद्यावर हात टाकून त्यांना धीर दिला . का ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याने त्यांच्या खांद्यावर हात टाकला. हा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र त्यांच्या अशा वागण्याने सध्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपामध्ये देखील संशयाची ठिणगी पेटली आहे. माझा आता ही ठिणगी पेटेल का विजेल हेच आता पहावे लागणार आहे