*प्रलंबित प्रश्न सुटणार कधी….?*
_कंग्राळी खुर्द गावच्या शेत वाडीतून वाहणाऱ्या नाल्यावर असणारा काळ्या-कट्ट्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबितच आहे. या काळा कट्ट्यावर असलेला रस्ता प्रतिवर्षी पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातो यावर्षी देखील अशीच परिस्थिती तिथं निर्माण होऊन त्या पुलावरून शेत वाडीत जाणाऱ्या येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे तात्पुरता त्या रस्त्याची दुरुस्ती केली. कारण या काळ्या-कट्ट्यावरील पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी लागणारा मोठा निधी ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसल्याकारणाने गेली कित्येक वर्षे याचा त्रास शेतकरी वर्गाला करावा लागत आहे.आणि या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यमान आमदारांना अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी या कामाकडे साफ दुर्लक्षच केलंय हे पाहता यावर्षी तरी या पुलाचे काम होईल याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना भात कापणी आणि मळणीच्या दिवसात ये जा करताना त्रास होऊ नये म्हणून ग्रा.सदस्यांनी तात्पुरता माती टाकून वाट करून दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आश्वासन दिले की आम्ही या पुलाचे नवीन बांधकाम करण्यासाठी पुन्हा एकदा आमदारांना भेटून सर्वोपरी प्रयत्न करू. यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य राकेश पाटील, प्रशांत पाटील, विनायक कम्मार व ग्रामपंचायत अधिकारी (PDO) गोपाळ नाईक उपस्थित होते._