‘कॅमेरे नसतानाही दंडाची भीती! कचरा टाकणाऱ्यांना नियम कधी?’
बेळगाव :
न्यू गुड शेड रोडवर एक फलक लावण्यात आला आहे – “येथे कचरा टाकू नका, सीसीटीव्ही कॅमेरा आपल्यावर लक्ष ठेवून आहे, नियमभंग केल्यास ५०० रुपयांचा दंड होईल.”
पण प्रत्यक्षात परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे हा फलक केवळ दाखवण्यापुरता असल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.
आज हेल्मेट न घातल्यास वाहनचालकांच्या घरपोच पावत्या पोहोचतात, तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी हे काम सोपे केले आहे. मग कचरा टाकणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरातील रस्ते व गल्ल्यांमध्ये रोज वाढत चाललेला कचऱ्याचा ढिगारा पाहता, प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. अन्यथा “कॅमेरा आहे पण दिसत नाही” ही घोषवाक्ये नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरतील.