आपत्कालीन दुर्घटनेच्या वेळी कोणती दक्षता घ्यावी
HERF रेस्क्यू टीम बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथे दिनांक 30 रोजी जवाहरलाल तलाव निपाणी या ठिकाणी पूर परिस्थिती नियंत्रण व व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देण्यात आले या शिबिरामध्ये आपत्कालीन दुर्घटनेच्या वेळी कोणती दक्षता घेतली पाहिजे, त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये घरगुती गॅस गळती झाल्यास त्यावेळी काय करावे लागते,
व पूर परिस्थिती काळामध्ये स्वतः घ्यावयाची दक्षता, व इतरांना मदत करताना कोणकोणते साहित्य वापरावे, एखादा व्यक्ती पाण्यात बुडत असल्यास त्यांना कशा पद्धतीने सुखरूप वाचवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी दोरी, रिकामी पाण्याची बॉटल,ओढणी, याचा वापर करून आपण एकमेकांना सहाय्य करू शकतो याबद्दल प्रशिक्षण दिले शिबिरामध्ये प्रथमोपचार पद्धत, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, स्कोबा डायविंग, ऑक्सिजन सिलेंडर, पाणी बॉटल पासून लाईफ जॅकेट बनवणे, पाणी बॉटल पासून बोट बनवणे,
याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले व पूर परिस्थिती च्या वेळी वापरण्यात येणारे साहित्य याच्याबद्दल माहिती देण्यात आली. HERF टीमचे मुख्य प्रशिक्षक बसवराज हिरेमठ व त्यांचे सहकारी यांनी प्रशिक्षण दिले व प्रात्यक्षिक करून दाखवले. या शिबिरामध्ये प्रवीण कुरळुप्पे., जितेंद्र कांबळे, सोमनाथ कोळी, नामदेव केंगारे, अमित कोळी, अजित कोळी, पवन अंकुशे, अर्जुन बुर्ली, विशाल शेळके, अर्जुन शेळके, विशाल जाधव, राजु लिगाडे, दीपक बुधीहाळे, युवराज निकम, कोडोली ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष वैभव पाटील, चंद्रसेन घोरपडे, त्याच बरोबर कोडणी, कुन्नूर, भोज, सौंदलगा, निपाणी, मांगुर या ठिकाणावरून अशा एकूण 122 युवकांनी व युवतीने त्याचबरोबर महिला वर्गाने सुद्धा या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये मनोगत व्यक्त करताना इचलकरंजी जिल्हा बजरंग दल सहसंयोजक अजित पारळे बोलताना म्हणाले की गेले चार वर्ष प्रत्येक वर्षी पावसाचे प्रमाण वाढत आहे त्याचबरोबर नदीकडे असणाऱ्या गावाला पूर परिस्थिती सामना करावा लागत आहे त्यांना योग्य त्यावेळी मदत कार्य करणे अवघड होत आहे याचे गांभीर्य ओळखून प्रत्येक खेडो पाडी गावातील युवकांनी असे पूर परिस्थिती नियंत्रण प्रशिक्षण आत्मसात करून आपल्या गावातील नागरिकांचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनत चाललेली आहे असे मनोगत व्यक्त केले या शिबिराचे आयोजन बजरंग दल निपाणी प्रखंड व सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
अकॅडमीच्या वतीने HERF टीमचे सत्कार करण्यात आला. यावेळी मातृशक्ती सरिता पारळे, अर्चना निर्मले, पूजा मोहिते, सावित्री खोत, अनुष्का चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन निर्मले यांनी केले तर आभार राजेश आवटे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी निपाणी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.