नवीन संकल्प मनाशी बाळगून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत जल्लोषी वातावरणात करण्यात आले.नववर्षाचे स्वागत ओल्ड मॅन चे दहन करून आणि फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले.शहर आणि परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध संगीत,नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संगीताच्या तालावर तरुण ,तरुणी नृत्य करत होते.शहरातील हॉटेल आणि रिसॉर्ट मध्ये आयोजित संगीत,नृत्य कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.कॅम्प भागात रात्री बाराच्या ठोक्याला ओल्ड मॅन चे दहन करून आणि आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.कॅम्प भागात ओल्ड मॅन पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी झाली होती.पोलीस खात्याने शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.