शहरात दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला विविध ठिकाणी गळती लागली असल्याने शहरात 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठात व्यत्यय येणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.
हिडकला कच्चा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एम एस आणि जुन्या पी एस सी पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव शहरात दोन दिवस व्यत्यय येणार आहे.
शहरातील सदाशिवनगर बसव कॉलनी कपिलेश्वर नगर सुभाष नगर अशोक नगर माळ मारुती एक्झिस्टंट एरिया न्यू गांधीनगर कणबर्गी कुडची हिंडाल्को फॅक्टरी के एआयडीबी औद्योगिक वसाहत डिफेन्स परिसर सैनिक नगर केएलई परिसर बीम्स परिसर सह्याद्री नगर कुवेंपू नगर टीव्ही सेंटर या उत्तर भागात पाणीपुरवठ्यात व्यक्त येणार आहे.
तर दक्षिण भागात मजगाव नानावाडी चिदंबर नगर शहापूर वडगाव जुने बेळगाव या ठिकाणी पाणीपुरवठा दोन दिवस केला जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.