*चव्हाट गल्ली भागात दोन महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प*
ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या काही भागात आठ दिवसात तर काही भागात एक महिना आड पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
येथील चव्हाट गल्ली ओल्ड पीबी रोड येथे दोन महिन्यानंतर पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच या ठिकाणी एल अँड टी कंपनीने 24 तास पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन घातले असल्याने पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे दूषित पाणी येत आहे.
हे दूषित पाणी काही नागरिकांनी वापरले असता त्यांना आरोग्याच्या समस्या देखील उद्भवल्या आहेत. तसेच दोन महिना आड एकदा पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे आम्हाला सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी चव्हाट गल्ली येथील नागरिकांनी केली आहे.