रामतीर्थ नगर परिसरातील रहिवाशांना दिली भेट
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी परिसरातील रहिवाशांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी रामतीर्थ नगर शिवालयाला भेट दिली. याप्रसंगी मंदिर कमिटी व रहिवाशांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी रहिवाशांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेतली असून लवकरच सर्व समस्यांवर काम सुरू करू, असे आश्वासन दिले.
तसेच मतदान झाल्यापासून प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत, नवीन प्रकल्प हाती घ्यावेत, शहरात विकासकामांना सुरुवात झाली आहे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत .शहराच्या भल्यासाठी काम करणारा आमदार लोकांमध्ये दिसुनही बराच काळ लोटला असे मनोगत रहिवाशांनी व्यक्त केले.