पहिल्यांदाच विश्वकर्मा समाज हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहे. भगवान विश्वकर्मा यांनी जगाची निर्मिती केली आहे मात्र विश्व निर्माण करणाऱ्या समाजाकडेच दुर्लक्ष झाले असल्याने विश्वकर्मा समाजाला इतर मागासवर्गीय जातीचे दर्जा दिला जावा अशा मागणीचे निवेदन आज श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागणीचे निवेदन विश्वकर्मा समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढून दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली आहे. ती 17 सप्टेंबर पासून सुरू होणार असून ती पूर्णपणे आमच्या समाजासाठी असावी त्यामुळे आमच्या मुलांचे आणि समाजाचे भवितव्य उज्वल होणार आहे.
या योजनेचा लाभ विश्वकर्मा समाज बांधवातील प्रत्येक नागरिकाला व्हावा मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी निवेदन देण्याकरिता निपाणी कारवार खानापूर संकेश्वर चिकोडी कोल्हापूर मुंबई येथील विश्वकर्मा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल इथून जोरदार निदर्शने करत विश्वकर्मा सेवा संघाच्या सदस्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.