This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*विश्वभारती मॅरेथॉन २०२३*

*विश्वभारती मॅरेथॉन २०२३*
D Media 24

विश्वभारती मॅरेथॉन २०२३

विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल, कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातील या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी 16 सप्टेंबरला गेली पाच वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि

त्यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा विश्वभारती कला क्रीडा संघटनेने आयोजित केली आहे.

 

या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना कारगिल येथील 16 सप्टेंबर 2023 या कारगिल मॅरेथॉन मध्ये सहभाग होण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा 11 जून 23 रोजी बेळगाव येथे पहिल्यांदाच आयोजित केली आहे. या सर्व विजयी उमेदवारांना आकर्षक बक्षिसे व त्यांना कोचिंग मिळण्याची संधी संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे्.

तरी या संधीचा सर्व खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा ही विनंती आहे.

स्पर्धेचे अटी व नियम.

1) फुल मॅरेथॉन /42.195 किलोमीटर अंतराची असेल

खुल्या गटासाठी वयोमर्यादा 18 वर्षावरीलत प्रवेश फी प्रत्येकी 700 रुपये

2) हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराची असेल

पुरुष व महिला गट 18 वर्षांवरील

प्रवेश फी 600 रुपये

3) दहा किलोमीटर पुरुष व महिला गटासाठी 18 वर्षावरील प्रवेश फी 500 रुपये

4) दहा किलोमीटर अंतर पुरुष व महिला गट वयोमर्यादा 35 वर्षावरील प्रवेश फी 500 रुपये

 

5) ड्रीम मॅरेथॉन सर्वांसाठी खुली

स्पर्धा प्रवेश फी 200 रुपये

 

स्पर्धकासाठी प्रवेश प्रक्रिया

1. मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक

2. आधार कार्ड आवश्यक

3. डिजिटल पेमेंट ची सुविधा. (*कारगिल मॅरेथॉन -२०२३ मधील पहिल्या विजेत्यांना कारगिल मॅरेथॉन भाग घेण्याची संधी मिळणार, हेच मोठें अमोल बक्षिस आहे.त्या वीजेत्याना दोन‌ महिने कोचिंग व येण्या जाण्यासाठीचा सर्व खर्च विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन उचलणार आहे.

ही देशातील पहिली आगळी वेगळी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कारगिल जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांची स्पर्धेकानी कृपया नोंद घ्यावी ही विनंती आहे.

Cash prize नाही पण मेडल कप व उस्फुर्तपणे कांहीं दानशूर मंडळीकडून विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply