लिंगायत पंचमसाली समाजाचा दोन अन वर्गात समावेश करण्यात यावे याकरिता विराट मोर्चा
लिंगायत पंचमसाली समाजाचा दोन अन वर्गात समावेश करण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई करणार आहेत अशी माहिती बसवराज पाटील यत्नाळ यांनी दिली.
लिंगायत पंचमसाली समाजाने गुरुवारी सकाळी हिरे बागेवाडी येथून कुडल संगम पिठाचे जगदगुरू श्री जय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण सौध पर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन छेडले होते.मोर्चात एक लाखाहून अधिक लिंगायत पंचमसाली समाजाचे बांधव सहभागी झाले होते.यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.हातात भगवे झेंडे धरून मोर्चात बांधव सहभागी झाले होते.हर हर महादेव,आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी मोर्चात सहभागी झालेल्यांनी केली.मोर्चा सुवर्ण सौध येथे आल्यावर
जय मृत्युंजय स्वामी आणि लोकप्रतिनिधी व्यासपीठावर गेले.यावेळी स्वामीजींच्या सह उपस्थितांनी नांगर धरून उंचावला.नंतर स्वामीजी चर्चेसाठी सुवर्ण सौध येथे गेले व त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली .बुधवारी आरक्षणाच्या बाबत सर्वपक्षीय बैठक घेणार असून गुरुवारी आरक्षण जाहीर करू असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.त्या नंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.