राष्ट्रीय कराटे चॅम्पियनचा मान विराज लाडने पटकाविला
बेळगाव: बेंगलोर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चॅम्पियनचा मान विराज लाड यांनी मिळविला आहे. विराज महेश लाड हा बेळगावचा असून त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराज हा मराठा मंडळ इंग्लिश माध्यम शाळेचा विद्यार्थी आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश लाड यांचा सुपुत्र आहे. याच प्रमाणे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.