This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान !!*

*विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान !!*
D Media 24

विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान !!
बेळगांव:
येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला . मानपत्र , पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की योग्य माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या साहित्यिकाला लाभतो , हा योग दुर्मिळ आहे !! द का हसमनीस यांनी आपल्या लेखनाने कथा , कादंबरी , चित्रपटकथा , चित्रपट अशा विविध कला क्षेत्रात अमोल असे योगदान दिले आहे. डॉ . गायकवाड यांनीही कथा , कादंबरी, नाटक , समीक्षा, संशोधन , अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे . ज्यांची पुस्तके सहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत असा या काळातील एकमेव साहित्यिक म्हणजे डॉ. गायकवाड !!
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले , फार मोठ्या व्यक्तीच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा आहे . अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो . ग्रामीण साहित्याची एक मोठी पिढी द. का. हसमनीस यांनी घडवली ! अनेक नामांकित लेखक त्यांनी घडवले . त्यांच्या नावाचा पुरस्कार हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे !!मी द का हसमनीस आणि त्यांचे नातू मा . विक्रम हसमनीस यांचा ॠणी आहे !

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील , संमेलनाचे संयोजक रघुनाथ मेटकरी , विश्वनाथ गायकवाड , पद्मश्री भाटिया, सौ ललिता सबनीस ,डॉ. ऋषिकेश मेटकरी प्रा.श्रुती वडगबाळकर असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते !!


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.