भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी
विनायक मोरे यांची फेरनिवड
भारत विकास परिषदेच्या वार्षिक कार्यकारिणी सभेत बेळगाव शाखा अध्यक्षपदी श्री विनायक मोरे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून श्री के. व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून श्री डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. परिषदेच्या नूतन राष्ट्रीय महिला कार्यकारिणीच्या सदस्यपदी बेळगांव शाखेच्या सौ. स्वाती घोडेकर तसेच दक्षिण भारत विभागीय सचिव म्हणून श्री पांडुरंग नायक यांना दायित्व देण्यात आल्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.https://dmedia24.com/second-national-open-roller-skating-championships-shone-in-belgaums-skater-in-2025/
बेळगाव शाखा कार्यकारिणीमध्ये सल्लागार म्हणून प्रा. व्ही. एन्. जोशी, नामजी देशपांडे, डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, डाॅ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, सीए श्रीनिवास शिवणगी, अरविंद कुलकर्णी, जयंत जोशी, स्वाती घोडेकर, सुखद देशपांडे, प्रा. अरूणा नाईक यांची निवड करण्यात आली.
कार्यकारी संघ – विनायक घोडेकर, कुमार पाटील, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, ॲड. सचिन जवळी, मालतेश पाटील, चंद्रशेखर इटी, कुबेर गणेशवाडी, नामदेव कोलेकर, पी. जे. घाडी, विजय हिडदुग्गी, शुभकांत कलघटगी, रमेश पाटील, सुधन्व पुजार तसेच महिला कार्यकारिणी सदस्या म्हणून रजनी गुर्जर, जया नायक, शुभांगी मिराशी, विद्या इटी, स्नेहा सांगलीकर, लक्ष्मी तिगडी, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, रोहिणी पाटील, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, डॉ. प्रेमा ग्रामोपाध्ये, ॲड. बना कौजलगी, योगिता हिरेमठ, ज्योत्स्ना गिलबिले, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील यांना दायित्व देण्यात आले.
प्रारंभी विनायक मोरे यांनी सर्वांचे स्वागत करून वार्षिक अहवाल सादर केला. आगामी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.
भारत विकास परिषदेतर्फे प्रतिवर्षी अनेक सामाजिक- सांस्कृतिक- शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विकलांग सहाय्यता, आरोग्य तपासणी, ग्रामविकास, राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा, भारत को जानो, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गुरू वंदना व छात्र अभिनंदन, झाडे लावा – झाडे जगवा, स्वच्छता अभियान, दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सेवा-संस्कार शिबिरे आदिंचा समावेश आहे.