ट्रॉलीमधून गवत नेताना दक्षता गरजेची
बेळगाव:
सध्या तालुक्यातील विविध गावातील शेतामधून वाळलेले गवत अर्थात पिंजर नेण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र हे गवत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरताना आणि त्या गवताची वाहतूक करताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी याबाबतीत दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे गवत भरताना आणि गवताची वाहतूक करताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.https://dmedia24.com/young-mans-suicide/
सध्या शेती शिवारातून वाळलेले गवत नेण्याच्या कामाला वेग आला आहे. ट्रॅक्टर ट्रॉली बरोबरच बैलगाडीतून देखील गवताची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉलीतून भरलेले गवत नेताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे काही वेळेला अनेक दुर्घटना ही घडत आहेत. प्रमाणापेक्षा जास्त गवत भरल्याने काही ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली उलटण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर विद्युत वाहिन्याला गवताचा स्पर्श झाल्यास शॉर्ट सर्किट होऊन आगीची दुर्घटना घडण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत.
प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या गवताच्या ट्रॉलीची वाहतूक करत असताना चालकाचा तोल गेल्याने ट्रॉली रस्त्याकडेला उलटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला सर्वत्र गवत पसरले होते. सध्या देखील प्रमाणापेक्षा जास्त गवत भरून ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक सुरू असल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे.