विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलन उत्साहात
बेळगांव ता 17. शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा शाळेच्या सभागृहात गोपाळ जिनगौडा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलन उत्साहात पार पडले.
विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ जिनगौंडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, सचिव कुंतीसागर हारदी, विद्याभारती राज्य कार्यदर्शी उमेशकुमार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव एस व्ही कुलकर्णी, गोपाळ जिनगौंडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, रोशनी रोड्रिक्स एस व्ही व्हंनुगल ,अँड चेतन मणेरीकर,रामनाथ नाईक,व्ही एस घोडखिंडी अनंत कपिलेश्वरी, प्रज्वल निलजगी,उपस्थित होते .
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती ओंकार भारतमाता फोटो पूजन करून शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. जिनगौंडा शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे परिचय सुजाता दप्तरदार तर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सचिव एस व्ही कुलकर्णी व उमेश कुमार यांनी विद्याभारती जिल्हा व राज्य कार्याची माहिती दिली
प्रमुख पाहुणे गोपाळ जिनगौडा यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्या ही शिकविण्याचे साधन असून ते विकण्याचे नसून शिक्षक कसा राहिला पाहिजे त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना श्रेष्ठ विद्यार्थी कसे घडवायचे ही कला शिक्षकांत राहणे अत्यंत गरजेचे आहे शिक्षिका ही सरस्वतीप्रमाणे राहणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणे सोपे जाते असे ते म्हणाले, धारवाडचे विनायक भट यांनी भारतीय ज्ञानपरंपरा वेद पुराण संस्कृत याबद्दल माहिती दिली तर आशा कुलकर्णी यांनी आगामी वर्षात होणाऱ्या विद्याभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती व आयोजन शाळेची नावे घोषित केली. यानंतर झालेल्या सामूहिक बैठकीत राघवेंद्र कुलकर्णी, माधव पुणेकर, व्ही एस व्हनुगल, चंद्रकांत पाटील, उमेश कुमार, रामनाथ नाईक, एस व्ही कुलकर्णी, सुजाता दप्तरदार,यांनी विविध विषया बद्दल माहिती देत आगामी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची विषयी बैठक घेतली
या विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलनाला संतमीरा स्कूल अनगोळ, संत मीरा स्कूल गणेशपुर, हनिवेल स्कूल खानापूर ,स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर ,गोपाळ जीनगौंडा स्कूल शिंदोळी ,सी व्ही रामन स्कूल ,ज्ञान प्रबोधिनी स्कूल रामदुर्ग शाळेतून 200हून अधिक शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता पेटकर तर प्रीती कोलकार यांनी आभार मानले.