विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय पूर्व बैठक उत्साहात.
बेळगाव ता ,28. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती पूर्व बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, उमेश कुमार, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर , खजिनदार रामनाथ नाईक संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी विद्याभारती जिल्हा सचिव एस व्ही कुलकर्णी,अमरनाथ जी उपस्थित होते, प्रारंभी सरोजा कटगेरी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, यानंतर पाहुण्यांचे हस्ते सरस्वती भारतमाता ओमकार फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
या बैठकीत आगामी होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील विद्याभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली .तसेच संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ येथे 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान होणाऱ्या शिशु शिक्षक शिबिराबाबत चर्चा करण्यात आली यात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी दिली व सर्व विद्याभारती संलग्नित शाळेने यात उत्साहाने भाग घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आवाहन केले. https://dmedia24.com/belgaum-city-championship-in-district-level-teachers-cricket-tournament/
तसेच आगामी होणाऱ्या विद्याभारती बेळगाव जिल्हा शैक्षणिक संमेलन शनिवार तारीख 28 जून रोजी स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर तसेच 12 जुलै रोजी विविध विषयाची कार्यशाळा देवेंद्र जिंनगौडा शाळेत तसेच ऑगस्टमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा शांतिनिकेतन स्कूल खानापूर तर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संत मीरा गणेशपुर शाळेत योगा, बुद्धिबळ ,कबड्डी, मलखांब, कराटे, संत मीरा अनगोळ शाळेत अथलेटिक्स, फुटबॉल ,हँडबॉल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर शाळेत हॉलीबॉल, थ्रोबॉल, खो खो अशा स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला या बैठकीला शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे, विजयालक्ष्मी पाटील, श्रद्धा पाटील, आरती पाटील, विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील प्रेमा मेलिनमनी विना जोशी, प्रीती कोलकार व विविध शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.