‘वेणूग्राम’तर्फे ‘वर्ल्ड बाइसिकल डे’ अपूर्व उत्साहात
वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावतर्फे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सहकार्याने 30 कि. मी. सायकलिंग करण्याद्वारे आज शनिवारी सकाळी ‘वर्ल्ड बाइसिकल डे’ अर्थात जागतिक सायकल दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे यंदा आज शनिवारी वर्ल्ड बाइसिकल डे नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा केला गेला. बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सहकार्याने साजऱ्या करण्यात आलेल्या या बायसिकल डेनिमित्त आरपीडी सर्कल टिळकवाडी ते इंडाल मागील रामतीर्थ मंदिर आणि पुन्हा आरपीडी सर्कल असा 30 कि. मी. सायकलिंग प्रवासाचा उपक्रम राबविण्यात आला. शुभारंभाप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे जिल्हा सर्व्हिलन्स अधिकारी डॉ. बी. तुक्कार, टीपीसी एनसीडी सेल बेळगावचे डॉ. नितीन, बिम्स एनसीडी क्लिनिकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बाळीकाई, वेणूग्राम सायकलिंग क्लबचे अध्यक्ष अजित शेरेगार यांच्यासह क्लबचे सदस्य आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
वेणूग्राम सायकलिंग क्लबचे अध्यक्ष अजित शेरेगार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या सायकलिंग उपक्रमात क्लबच्या सदस्यांसह अन्य हौशी सायकलिंगपटू असे जवळपास 50 सायकलस्वार मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. यामध्ये सचिन अष्टेकर, उर्मी शेरेगार, महेश चौगुले, रोहन हरगुडे, धीरज भाटे, रूपा कापडिया, चाणक्य एस. जी., रतन मदली, कौशिक पंडित, अरुण पाटील, मनोज गांवकर, सुजाता गांवकर, नितीन मिरजी, विश्वनाथ कोट्टूर, प्रतिक वेर्णेकर, सचिन कुलगोड, अनिल गोडसे, भाऊ नेसरकर, रवी भैरवाडगी, संजीव गुडगनट्टी, शलाका जठार, मेघना हेगडे, प्रदोष हेगडे, रोहित कापडिया, विक्रांत कलखामकर, रमेश गोवेकर, सौरभ अस्वले, ऋषभ दोरकाडी, मनीषा अलवानी, हेरंब सरदेसाई, श्रीधर पाटील, रामनाथ सडेकर, राधाकृष्ण नायडू, अवंतिका रेवण्णावर व इतर हौशी सायकलपटूंचा समावेश होता. अतिशय उत्साहाने राबवण्यात आलेल्या या सायकलिंग उपक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.