बेळगांव: तालुक्यातील कलमेश्वर गल्ली कंग्राळी बी.के येथील सिद्धिविनायक वर्धापन दिन व गणेश जयंती निमित्त १ फेब्रु शनिवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी महाभिषेक व गण होम, आरती होणार आहे.
रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले २२ वर्ष कलमेश्वर युवक मंडळ कलमेश्वर गल्ली यांच्यावतीने वर्धापन दिन व गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसेच यावर्षीही करण्यात येणार आहे तरी रविवारी महाप्रसादासाठी दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले.