बेळगाव, दि. २०- सर्वापित्री अमावास्ये निमित्त रविवारी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी बारा वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी कथा वाचन, शनी शांती आणि तीळ होम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अभिषेक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून महा आरती करण्यात येईल. अभिषेक, पूजा करू इच्छिणाऱ्या भक्तांनी मंदिरात संपर्क साधावा.
Dmedia 24 > Local News > *सर्वापित्री अमावास्ये निमित्त श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
*सर्वापित्री अमावास्ये निमित्त श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
Deepak Sutar20/09/2025
posted on
