16 ऑक्टोबर रोजी रामकृष्ण मिशन *आश्रमातर्फे* विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्वामी *विवेकानंदांनी* बेळगावला दि.१६ ऑक्टोबर १८९२ रोजी भेट दिली होती. या भेटीच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशन *आश्रमातर्फे* विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिसालदार गल्लीतील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दि.१६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.३० या वेळेत विशेष सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुरमणी डॉ.दत्तात्रेय वेलणकर हे स्वामी *विवेकानंदांच्या* जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. भक्तांनी स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन *स्वामीजींचे* आशीर्वाद प्राप्त करून प्रसादाचा लाभ घ्यावा असे रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे कळविण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदांचे रिसालदार गल्लीतील प्रख्यात वकील सदाशिव बाळकृष्ण भाटे यांच्या निवासस्थानी तीन दिवस वास्तव्य होते. या वास्तूचे स्वामी विवेकानंद स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. स्वामीजींनी बेळगावातील वास्तव्याच्या दरम्यान वापरलेला पलंग,काठी, आणि आरसा *येथे* जतन करून ठेवण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित चित्र *प्रदर्शनदेखील* भक्तांना पाहता येईल असे रामकृष्ण मिशन आश्रम तर्फे कळविण्यात आले आहे.