जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना अनिल बेनके यांच्या कन्येचा वाढदिवस असल्याने त्यांनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तसेच आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गरजूंना आणि गोष्टींचे वितरण देखील केले आहे.
अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त एंजल फाउंडेशनच्या वतीने काल बसवन कुडची येथील नागनुरी श्री बसवेश्वर ट्रस्ट वृद्धाश्रम मध्ये मुलींना लागणाऱ्या त्या आवश्यक वस्तूंचे वितरण केले तसेच रविवार दिनांक 4 डिसेंबर रोजी शहरात महिलांकरिता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे या बाईकडे सर्वांना मोफत प्रवेश असणारा असून प्रथम येणाऱ्या क्रमांकाला पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ ही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
तसेच काल झालेल्या वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम अलिष्काच्या हस्ते केक कापून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर तिच्या हस्ते वृद्धाश्रमातील मुलींना गरजू वस्तूंचे वितरण करण्यात आले.
त्याचबरोबर आता अलिष्का चा वाढदिवसानिमित्त रविवारी देखील मोठ्या थाटामाटा बाईक रॅली शहरात काढण्यात येणार असून यावेळी महिलांनी या बाईक रॅलीत सहभागी होऊन बक्षिसे जिंकावीत असे आवाहन करण्यात आले आहे.