जी एस एस पी यु काॅलेजच्या धारिणी बायोक्लबद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन.
जी एस एस पी यु काॅलेजच्या जीवशास्त्रात विभागाद्वारे सालाबादप्रमाणे या वर्षी ही धारिणी बायोक्लबद्वारे विद्यार्थी वर्गात पर्यावरण आणि त्याचे संवर्धन या विषयी जागृकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन पर्यावरणाशी निगडीत विषय देऊन केले गेले.
यासाठी स्पर्धकांना वनजीवन छायाचित्रीकरण,पोस्टर्स आणि प्रतिकृती बनवणे हे विषय दिले गेले.
या आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमास अध्यक्ष प्राचार्य एस एन देसाई,उपप्राचार्य सचिन पवार, विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत सांबरेकर, प्रा.भारती सावंत (काळे)प्रा.संपदा भोसले,प्रा.प्रज्ञा अंकलखोपे,प्रा. वैशाली भारती, प्रा. सविता कुलकर्णी, प्रा. विनय कुलकर्णी, प्रा.विवेक किल्लेकर, प्रा.पल्लवी तरळे, प्रा.अनुजा चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी संपदा सुतार या विद्यार्थीनीच्या स्वागत गीतव्दारे झाली,उपस्थित मान्यवरांचे स्वागत विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत सांबरेकर यांनी केले, बायोक्लबचा वार्षिक अहवाल प्रा.प्रज्ञा अंकलखोपे यांनी सादर केले.
या स्पर्धेतील विविध विजेते वनजीवन छायाचित्रीकरण कु.मयुर रेडेकर,कु.स्वयंम बाद्रे,
प्रतिकृती बनवणे कु.लावण्या खनगावी,कु.रिध्दी प्रभू,कु भूमीका गणाचारीमठ,रक्षीता दयन्नावर,
पोस्टर्स बनविने कु.समीक्षा पाटील,कु.सीबा हवालदार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
प्राचार्य एस एन देसाई यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करतेवेळी सर्व स्पर्धक आणि प्राध्यापक वर्गाचे प्रथम अभिनंदन केले, तसेच या प्रकारचे उपक्रम विभागाद्वारे राबवून विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यासा बरोबर इतर विषयांचे ज्ञान प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे सुप्त कार्य करत आहेत असे उद्गार व्यक्त केले .
आभार प्रदर्शन प्रा. संपदा भोसले यांनी केले, सुत्रसंचालन कु.ऐश्वर्या या विद्यार्थीनीने केले.