बेळगांव :अखिल कर्नाटक वाल्मिकी सोशल फाऊंडेशनच्या राज्याध्यक्ष सौ.रेणुका अडवेप्पा कुंदेड व सौ.रेणुका फाऊंडेशन न्यू वैभव नगर अध्यक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वाल्मिकी सर्कल बॉक्साईट रोड येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
तसेच 250 महिलानी डोक्यावरती जलकुंभ घेऊन मिरवणूक काढली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाल्मिकी समाजाचे युवा नेते राहुल जारकीहोळी हे उपस्थित होते. राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी श्री.राजीव कालेनाट्टी, श्री. कल्लाप्पा नाईक, श्री. संथम्मन्ना मूकनवर, श्री. सुभाष हट्टीहोळी, कु. सुवर्णा लंकन्नवर, कु. गंगाव्वा बुदारी यांच्यासहित वाल्मिकी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.