ईद मिलाद मिरवणुकीतील उर्दू-इंग्रजी बॅनरवर करवे संतापले; महापालिकेत घुसून तीव्र आंदोलन
बेळगाव : ईद मिलाद मिरवणुकीदरम्यान उर्दू व इंग्रजी भाषेत लावलेले बॅनर पाहून कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या (करवे) कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बॅनरमध्ये कन्नड भाषेला स्थान न दिल्याचा आरोप करवेने केला आहे.
याच निषेधार्थ करवे कार्यकर्त्यांनी बेळगाव शहर महापालिकेत धडक दिली. महापालिकेच्या गेटवरील अडथळे व बॅरिकेड्स हटवून ते थेट कार्यालयात घुसले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
घटनेदरम्यान करवे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
करवे कार्यकर्त्यांनी संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली असून “कन्नडला दुय्यम वागणूक देणे आम्ही सहन करणार नाही” असा इशारा दिला आहे. प्रशासनाने याप्रकरणी तपास सुरू केला असून पुढील कारवाईबाबत उत्सुकता आहे.