आज नगर विकास मंत्री बैरती सुरेश यांनी बेळगावला भेट दिली यावेळी भेटी आदी चन्नम्मा सर्कल येथील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की भाजपचे आमदार बसनगवडा पाटील हे किती योग्य आहेत हे माहित आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नालायक म्हणणारे भाजपचे बसनगौडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत तुलना करण्याची लायकी नाही हे आधी त्यांनी पहावे अशी सडक टीका त्यांनी भाजपचे आमदार बसनगोडा पाटील यांच्यावर केली.
त्यानंतर ते म्हणाले बसनगौडा पाटील यांना हे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या लायकीचे आहेत का हा मुळात प्रश्न आहे सिद्धरामय यांनी लोकांसाठी मोठे योगदान दिले आहे पाटील यांनी काय केले आहे ते आधी सांगावे त्यानंतर मग लायकी काढावी असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी राज्यातील संबंधित जिल्ह्याच्या आहारानुसार कॅन्टीनमध्ये अल्पदरात लोकांना जेवण दिले जाणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद करणार नसल्याचे देखील सांगितले. नगरपरिषद नगर महानगरपालिका यांच्या आख्यारीत इंदिरा कँटीन ची पुनर्बांधणी केली जात आहे भाजप सरकारने इंदिरा कॅन्टीन चे नाव खराब केले आहे मात्र आता योग्य व्यवस्थापन करून आपण ही योजना कायम चालू ठेवणार असल्याचे सांगितले.
तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणे याकरिता योग्य उपाय योजना राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून राज्यात 24 जिल्ह्यात बैठका घेतल्या आहेत फक्त सात जिल्हे बाकी आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली.
Pretty section of content. I just stumbled upon your blog and in accession capital to claim that I get actually loved account your blog posts. Anyway I will be subscribing to your feeds and even I fulfillment you access consistently quickly.
Very well written article. It will be useful to anybody who usess it, including me. Keep up the good work – looking forward to more posts.