*डॉ. प्रकाश रायकर फाउंडेशन यांच्यावतीने बेळगावात ताल ऋषी पंडित आनिंदो चटर्जी यांच्या ‘तपस्या’ पुस्तकाचे अनावरण तसेच श्री विशाल मोडक यांचा गंडा बंधन सोहळा.*
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी 5 वाजता गोगटे कॉलेजच्या के के वेणूगोपाल सभागृहात हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला खूप मोठे मान्यवर मोठे हिंदुस्तानी संगीतातील दिग्गज तसेच बेळगावातील सर्व संगीत क्षेत्रातील कलाकार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून amadar श्री अभय पाटील , जी आय टी व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन श्री राजेंद्र बेळगावकर , डॉक्टर प्रकाश रायकर (USA), बंगलुरुचे प्रसिद्ध तबला वादक पंडित रवींद्र यावगल, धारवाडचे प्रसिद्ध तबला वादक पंडित रघुनाथ नाकोड आणि पंडित रविकिरण नाकोड, गोव्यावरून पंडित अमोद दंडगे तसेच श्री अमित भोसले, श्री अमोणकर, बेळगावचे पंडित गजाननराव कुलकर्णी आणि सर्व इतर दिग्गज मान्यवर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात स्वतः *ताल ऋषी पंडित अनिंदो चटर्जी*(कलकत्ता) यांची खास उपस्थिती असणार आहे
बेळगावचे नाव अजरामर करून टाकणाऱ्या या पहिल्या जगविख्यात ताल ऋषी पंडित आनंदो चटर्जी यांच्या पुस्तकाचे अनावरण पाहण्यासाठी राज्यातून, देशातून नव्हे तर परदेशाहूनही लोक आवर्जून बेळगावात येत आहेत.
ताल ऋषी पंडित अनिंदो गुरुजींच्या *तपस्या* या पुस्तकाचे अनावरण या कार्यक्रमात होणार असून या कार्यक्रमात गुरुजींच्या हस्ते श्री विशाल मोडक यांचे *गंडा बंधन* होणार आहे,
या कार्यक्रमात तरंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे गायन व तबलावादन होणार असून पंडित आनंदो चटर्जी यांच्या तबलावादनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य खुला आहे असे डॉ. प्रकाश रायकर संस्थेच्या कार्यदर्शी सौ. समीरा मोडक व श्री. विशाल मोडक यांनी कळवले आहे.