महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बिनविरोध निवड
बेळगाव: महानगरपालिकेत अर्थ आणि कर, आरोग्य, सामाजिक ,न्याय आणि नगर नियोजन तसेच बांधकाम यासह लेखा अशा चार स्थायी समिती आहेत. या चारही स्थायी समिती भाजपकडे राहिल्या आहेत
आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत होते मात्र आता महाराष्ट्र एकीकरण समितीला चार आणि विरोधी गटाला तीन सदस्य असे समीकरण होते पण यंदा भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने एकूण सदस्य संख्येत सात पैकी पाच दोन असे समीकरण झाले आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या विविध स्थायी समितीच्या निवडणुकांसाठी नामांकन पत्र दाखल करण्याची आज शेवटची प्रक्रिया होती त्यानुसार आज भाजप काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी नामांकन पत्रे दाखल केली होती.
त्यानुसार महानगरपालिकेत केले सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षाला दोन सदस्य दिल्याने सदर निवडणूक बिनविरोध पार पडले चार समित्या प्रक्रियेत असे एकूण 28 सदस्यांची नियुक्ती स्थायी समितीवर करण्यात आली आहे.
यामध्ये अर्थ कर आणि दाद स्टाईल समितीमध्ये विना विजापुरी रेखा हुगार उदय उपरी संदीप जिरग्याळ प्रीती कामकर रेशमा भैरकदार शामूबिन पठाण यांचे नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय समितीमध्ये रवी धोत्रे, रमेश कामकार गोड रेश्मा कामकर श्रेयस नाकाडी , जयंत जाधव खुर्शीद मुल्ला इकरा मुल्ला यांची निवड झाली आहे.
त्याचबरोबर नगर नियोजन विकास स्थायी समितीमध्ये आनंद चव्हाण वाणी जोशी मंगेश पवार संतोष पेडणेकर रूपा चिखलदीणी जरीना फतेह खान शकील मुल्ला यांची निवड झाली असून देखा स्थायी समितीमध्ये गिरीश धोंगडी जयतीर्थ सौंदत्ती पूजा पाटील अफरोज मुल्ला ज्योती कडोलकर अभिजीत जवळकर सविता पाटील यांची निवड झाली आहे.