This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*दोघा चोरट्यांना अटक साडेसहा लाखाचे दागिने जप्त*

*दोघा चोरट्यांना अटक साडेसहा लाखाचे दागिने जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दोघा चोरट्यांना अटक साडेसहा लाखाचे दागिने जप्त
बेळगाव:
मार्केट पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. महाद्वार रोड येथील घरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी मार्केट पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयीतांची नावे चंद्रकांत उर्फ प्रेम कोटगी( रा.पांगुळ गल्ली बेळगाव), ओमकार भा. पाटील (लालबहादूर शास्त्रीनगर कलखांब ) अशी आहेत. दरम्यान 3 फेब्रुवारी 2024 रोजी महाद्वार रोड येथील रूपाली बिरजे यांच्या घरी चोरी झाली होती. याप्रकरणी मार्केट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

संबंधित चोरटे जुन्या भाजी मार्केट जवळ दागिने विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी या संशयताना अटक करून चौकशी केली. त्यावेळी या संशयीताने महाद्वार रोड, कलखांब आणि बसवन कुडची येथे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक महांतेश धामणनावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24