कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर वरून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडक बसून दोन जण गंभीर जखमी झाले.पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हलगा गावाजवळ हा अपघात घडला.कंटेनर च्या धडकेने ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला.दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले .
अपघात झाल्यावर दोन्ही वाहनांचे चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकून पडले होते.त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी पोलिसांना मदत केली.ट्रकमधे दोन जण प्रवासी होते ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात दोन्ही चालकांचे पाय तुटले आहेत.दोन्ही वाहन चालकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.