काँग्रेसच्या दोन याद्या जाहीर तर आज भाजप कोर कमिटीची बैठक
भाजपचे उमेदवार निश्चित करण्याकरिता पक्ष कार्यकारणीची बैठक आज होत आहे. शहरासह संपूर्ण कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस आणि जेडीएस तिन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत योग्य उमेदवार पाहून सर्वजण तिकीट जाहीर करणार आहेत. काँग्रेसने आपली दोन यादी जाहीर केली आहे तर तिसरी यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तसेच भाजपने अजून आपली पहिली यादी जाहीर केली नसून भाजप पक्ष सध्या कोर कमिटीची बैठक घेण्यात व्यस्त आहे. काल शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थाने भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न झाली यामध्ये कर्नाटकातील उमेदवारांच्या नावाबाबत विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी या महत्त्वाच्या बैठकीस मुख्यमंत्री बसवराज बोमाई ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरात निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान गुजरात प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह ,माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा उपस्थित होते.
तर दुसरीकडे काँग्रेसने निवडणुकीची जोरदार तयारी केली असून याआधी काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत तसेच तिसरी यादी भाजपचे तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आपली तिसरी यादी जाहीर करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.