शहरातील रहदारीचे आणि महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या पांगुळ गल्लीमध्ये काल तिहेरी अपघात घडला या अपघातात दुचाकी रिक्षा आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कारने ठोकल्याने कारसह ऑटोरिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले त्यामुळे या झालेल्या तिहेरी अपघातात विजेच्या खांबावरील टीसी खाली कोसळला ही घटना शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडले
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरगाव कारने रस्त्याशेजारी पार्क केलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ऑटोरिक्षा समोरील दुचाकीला धडक बसून तिच्यासह विजेच्या खांबावर जाऊन आदळली.तसेच विद्युत खांबावरील टीसी खाली कोसळल्याने मोठा स्फोट झाला.
यावेळी पहाटेच्या वेळी गल्लीत कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा ही घटना दुपारच्या सुमारास घडली असती तर मोठी जीवित हानी झाली असती.