बेळगाव जिल्हा पोलिस आणि बेळगाव पोलीस आयुक्तालय यांच्या तर्फे पोलीस हुतात्मा दिनानिमित्त हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.
पोलीस क्रीडांगणावर झालेल्या पोलीस हुतात्मा दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश त्यागराज इनवळी उपस्थित होते.उत्तर विभागाचे आय जी पी विकाशकुमार विकाश यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली कार्यक्रम पार पडला.बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.पोलीस हुतात्मा स्मारकाला प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
D Media 24 > Local News > *पोलीस हुतात्मा दिनानिमित्त हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना आदरांजली*
*पोलीस हुतात्मा दिनानिमित्त हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना आदरांजली*
Deepak Sutar21/10/2024
posted on


Leave a reply