प्रशिक्षण देणारे विमान कोसळले: देवाने कोणतीही जीवित हानी नाही
बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतामध्ये प्रशिक्षणा दरम्यान रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेच्या विमानात बिघड झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करताना विमान कोसळून वैमानिकासह एक जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.
सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की बेळगाव विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या रेडबर्ड वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या एका विमानाने आज सकाळी प्रशिक्षणासाठी हवाई उड्डाण केले. मात्र उड्डाण झाल्यावर विमानाकाच्या लक्षात आले की विमानामध्ये बिघाड झाला आहे .त्यामुळे त्याने मुतगा बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होनिहाळ तालुक्याच्या शेतात विमानाचे आपत्कालीन लँडिंग करत असताना ते सुरळीत न झाल्याने विमान शेतात कोसळले.
यावेळी चाके तुटून विमानाचा अपघात झाला आणि या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.