बेळगाव: एंजल फाउंडेशन व जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅडिशनल बाईक रॅलीच्या आयोजन रविवारी करण्यात आले होते. बाईक रॅली काढण्याचा उद्देश की आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे व नवीन पिढीला समजली पाहिजे या हेतूने या बाईक रॅलीच्या आयोजन केले जाते.
प्रथमता छत्रपती शिवाजी उद्या येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर फित कापून बाईक राहिलेला चालना देण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान इथून सुरुवात होऊन महात्मा फुले रोड, बसवेश्वर सर्कल, गोगटे सर्कल , कॅम्प, छत्रपती संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड ते कित्तूर चन्नम्मा येथील कन्नड साहित्य भवन येथे सांगता झाली.
त्यानंतर कन्नड साहित्य भवन मध्ये रोपट्याला पाणी घालून बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत शाल व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.
त्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
*विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे*
पुष्पा दत्ता जाधव प्रथम पारितोषिक ५००० रुपये ,
रेखा हट्टीकर द्वितीय पारितोषिक ३००० रुपये ,
स्वाती हट्टीकर तृतीय पारितोषिक २००० रुपये,
रेश्मा सावंत उत्तेजनार्थ १००० रुपये व ट्रॉफी देण्यात आले.बेस्ट जोडी महानतेश हलगी,प्रतीक्षा हलगी यांनी पटकाविले.
व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे श्री ऑर्थोचे देवेगौडा पाटील, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके, जीवन संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष गणपत पाटील, मॉडेल जिमचे मालक कीर्तेश कावळे होते.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भक्ती शिंदे व नीता शिरोडकर लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रज्योती देसाई यांनी केले.एंजल फाउंडेशन उपाध्यक्ष दीपक सुतार, सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडेकर, अक्षता नाईक उपस्थित होते.